Vijayapura

उन्हाच्या झळांमध्येही पर्यटकांची विजापूरकडे ओढ

Share

दुष्काळी जिल्हा आणि सर्वाधिक उन्हाच्या झळा सोसाव्या लागणारा भाग म्हणून विजापूर जिल्हा परिचित आहे. या भागातील नागरिक उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडणे टाळतात. मात्र या भागात अनेक पर्यटक उत्साहाने दाखल होतात. विजापूरमध्ये सध्या पर्यटकांची गर्दी वाढली असून अनेक ऐतिहासिक स्थळी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ दिसून येत आहे.

विजापूर जिल्हा हा ऐतिहासिक स्थळांची प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या भागात अनेक पर्यटक या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी दाखल होतात. वियार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या पडल्यामुळे अनेक पालकांची ओढ विजापूरमधील ऐतिहासिक ठिकाणी लागते. विजापूरमधील जनता उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याआधी अनेकवेळा विचार करत असतील मात्र पर्यटक मात्र उन्हाच्या झळा सोसत मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करतात. मागील वर्षी मार्च महिन्यात ३४९४० स्वदेशी पर्यटकांनी विजापूरमधील पर्यटन स्थळी भेट दिली होती. या वर्षी मार्च महिन्यात ५०३६९ पर्यटकांनी भेट दिली आहे. तर ११ विदेशी पर्यटकांनी देखील विजापूरला भेट दिली आहे. एप्रिल महिन्यात दररोज कमीतकमी २५०० ते ३००० पर्यटन भेट देत असून १८ एप्रिल रोजी मोफत गोलघुमट पाहण्याची संधी देण्यात येते. यामुळे त्यादिवशीही पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. विजापूर जिल्ह्यातील अलमट्टीम्युसियम, महात्मा बसवेश्वर जन्मभूमी, विजापूर शहारातील गोल घुमट, इब्राहिम रोजा, जोड घुमट, बारा कमान, गगन महाल, शिवालय यासह अनेक ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यासाठी असंख्य पर्यटक दाखल होत आहेत. केवळ स्वदेशीच नाही तर विदेशी पर्यटक देखील मोठी गर्दी करत आहेत.

रणरणत्या उन्हात घराबाहेर पाडण्यासाठी अनेकवेळा विचार करावा लागतो. मात्र हौशेला मोल नाही या उक्तीप्रमाणे उन्हाच्या झाला सोसत देखील विजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे.

Tags: