Belagavi

काँग्रेस रोडवर भर रस्त्यात मद्यपीच्या दंड-बैठका !

Share

 मदिराबाई घशाखाली उतरली की मद्यपी काय करतील याचा भरवसा नाही. बेळगावातील काँग्रेस रोडवर गुरुवारी सकाळी एका मद्यपीने भर रस्त्यातच दंडबैठका काढत याचा प्रत्यय आणून दिला

होय, तुम्ही हे जे दृश्य पाहताय ते आहे बेळगावातील काँग्रेस रोडवरचे. मदिरेचा अमल जरा अधिकच झाल्याने भर रस्त्यातच हे महाशय दंड-बैठका काढू लागले. त्यामुळे वाहनांना अडथळा होऊन हाय ड्रामा झाला. काही केल्या उठून उभे राहता न येणाऱ्या या मद्यपीमुळे वाहनचालकांची काही काळ तारांबळ उडाली. अखेर मद्यपीच्या या उपद्रवाने त्रासलेल्या वाहनचालकांनीच त्याला रस्त्यातून उचलून बाजूला केले अन वाहतूक पूर्ववत सुरु झाली.

Tags: