हर हर महादेव चा जयघोष आणि भक्तांचा अपूर्व उत्साह या साऱ्या भक्तिपूर्ण वातावरणात बेळगाव तालुक्यातील हलगा गावची श्री कलमेश्वर देवस्थानाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.

बेळगाव तालुक्यातील हलगा या गावात सालाबादप्रमाणे श्री कलमेश्वर यात्रा भरविण्यात आली होती. यात्रेच्या निमित्ताने इंगळ्या कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य भक्तांनी या कार्यक्रमात सहभाग घेत मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात यात्रा पार पाडली.
आंबील गाड्यांची मिरवणूक आणि रात्री श्री कलमेश्वर देवस्थानाची विशेष पूजा असे या यात्रेचे स्वरूप होते. याचप्रमाणे सालाबादप्रमाणे इंगळ्या कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. विधिवत पूजनानंतर असंख्य भाविकांनी इंगळयांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. गेल्या दोन वर्षात हि यात्रा मोठ्या प्रमाणात भरविण्यात आली नव्हती. कोरोना आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे खबरदारीसाठी हि यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र यंदा हि यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
या यात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या इंगळयांच्या कार्यक्रमात असंख्य भक्त श्रद्धेने सहभागी होतात. आपली मागणी पूर्ण करण्यासाठी उपवास धरून विशेष विधी अंतर्गत इंगळयांच्या कार्यक्रमात सहभागी होतात. संपूर्ण गावात घरोघरी आकर्षक रोषणाई आणि रांगोळ्यांची सजावट करण्यात आल्याने गावाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते.


Recent Comments