बेळगावातील टिळकवाडीतील आर. एल. लॉ कॉलेजमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता.

कायद्याचे अध्यापन : तंत्र आणि मंत्र’ या विषयावर आर. एल. लॉ कॉलेजमध्ये बुधवारी प्राध्यापकांची राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी संसाधन व्यक्ती म्हणून व्ही. एन. जोशी, डॉ. सी. राजशेखर, प्रा. जी. एम. वाघ उपस्थित होते.
यावेळी बोलताना निवृत्त प्राचार्य व्ही. एन. जोशी म्हणाले, शिक्षण देताना विध्यार्थ्यांना समोरासमोर शिक्षण दिले पाहिजे. तरच शिकविलेले सगळे विध्यार्थ्यांच्या डोक्यात जाते. अलीकडे कोरोना महामारीमुळे शिकविण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे.
पण त्यामुळे विध्यार्थ्यांना शिकविलेले तितक्या प्रभावीपणे समजून घेता येत नाही. मोबाईल हा तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार असला तरी त्याद्वारे दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत नीट पोहोचत नाही. अध्यापनात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. आजच्या युगात आधुनिक बदलांना अनुसरून शिकविणे जबाबदारीचे काम ठरले आहे असे जोशी यांनी सांगितले. यावेळी आर. एल. लॉ कॉलेजचे प्राचार्य ए. एच. हवालदार, आयक्यूएसी समन्वयक समीना नाहिद बेग, आर. एल. लॉ संस्थेचे चेअरमन ऍड. एम. आर. कुलकर्णी यांच्यासह अन्य उपस्थित होते.


Recent Comments