कर्नाटक सरकारच्या महत्वाकांक्षी ‘सकाल‘ योजनेला दशक पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून खानापूर शहरात जागृती जथ्याचे आयोजन केले होते.

खानापुरात बुधवारी ‘सकाल’ योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त जागृती जथा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर तहसीलदार प्रवीण जैन यांनी या जथ्याचे उदघाटन करून चालना दिली. त्यानंतर खानापुरातील शिवस्मारक चौक, बाजारपेठ आदी प्रमुख मार्गांवरून फिरून या जथ्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तहसील कार्यालय परिसरातच या जथ्याची सांगता करण्यात आली. जात, जन्म-मृत्यू दाखले तसेच सरकारी कागदपत्रे वेळेत मिळण्यासाठी सकाल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या जथ्यात उप तहसीलदार कल्लप्पा कोलकार, आनंद कोलकार, सुनील देसाई, विनायक वेंगुर्लेकर, शिवलीला अंगडी, मोहसीन दर्गावाले, व्ही. एस. हिरेमठ, प्रियांका फर्नांडिस, शशिकला कुंदगोळ, कुसुम संकनाळ, विवेक जवळी यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.


Recent Comments