भारतीय जनता पक्ष सिंचन योजना विषयात शून्य आहे, अशी टीका जेडीएस अध्यक्ष शंकर मूडलगी यांनी केली आहे.

आज हुक्केरी शहरात जेडीएस जनता जलधारे रथालाला चालना देऊन त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षावर टीका करत सिंचन प्राकलाप योजनेच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस पदयात्रेच्या माध्यमातून नाटक करत आहे तर भाजप डबल इंजिन सरकार असूनही सिंचन योजना राबविण्यात अयशस्वी ठरत असल्याची टीका त्यांनी केली आहे. प्रादेशिक पक्ष म्हणजेच जेडीएस पक्ष सत्तेवर आल्यास राज्यातील सर्व सिंचन योजना पाच वर्षात पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी चिकोडी जिल्हाध्यक्ष कल्लाप्पाण्णा मगेन्नावर, हुक्केरी तालुका ब्लॉक अध्यक्ष जाकीर नदाफ, शिवानंद नम्मक्कनवर, कालगौडा पाटील, रावसाहेब पाटील, इब्राहिम अत्तार, शब्बीर मुल्ला, कल्लय्या मठपती आदी उपस्थित होते.


Recent Comments