Belagavi

अवकाळीने उडवली बेळगावकरांची दाणादाण; झाडे वीजखांब कोसळून वाहनांचे नुकसान -झाड पडून वृद्धाचा मृत्यू

Share

 ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी दुपारी बेळगावकरांची दाणादाण उडवली. अनेक ठिकाणी वीजखांब आणि झाडे कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. काळी आमराईत गाडीवरून घरी चाललेल्या एका वृद्धाचा झाड पडून मृत्यू झाला.

व्हॉईस : होय, बेळगावात मंगळवारी दुपारी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने बेळगावकरांची अक्षरशः दाणादाण उडवली. जोरदार वारे आणि पावसाने अनेक ठिकाणी वीजखांब आणि झाडे कोसळल्याने पार्किंग केलेल्या ३५ हुन अधिक दुचाकींचा चेंदामेंदा झाला. काळी आमराईत गाडीवरून घरी चाललेल्या एका वृद्धाचा झाड पडून मृत्यू झाला. जिल्हा इस्पितळासमोर भले मोठे झाड कोसळून पडले. रस्त्याच्या दूतर्फे पार्क केलेल्या दुचाकींवरच हे झाड उन्मळून पडल्याने ३५हुन अधिक वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. सुदैवानेच याठिकाणी प्राणहानी झाली नाही. पावसामुळे रस्त्यावर वाहतूक नव्हती. लोकही आडोशाला उभे होते. त्यामुळेच मोठी दुर्घटना टळली. या झाडाच्या काही फांद्या रस्त्याच्या मध्येच पडल्याने पावसानंतरही वाहतूक ठप्प झाली होती. अग्निइशामक दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेऊन पडलेल्या झाडाच्या फांद्या कापून रस्ता मोकळा करण्याचे कार्य सुरु केले. या संदर्भात अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी आपली मराठीला अधिक माहिती दिली.

या घटनेसंदर्भात नागशांती मोटर्स शोरूमचे कर्मचारी महादेव यांनी सांगितले की,  ६.४५ च्या सुमारास क्लब रॊडवर मोठे झाड कोसळले. त्यापूर्वीच आम्ही या झाडाखाली थांबलेल्या एका मुलीला ओरडून सांगितल्याने तिने तेथून पळ काढला. त्यामुळे तिचा जीव वाचला. येथून एक ट्रक चालला होता. त्यावरही झाड कोसळले. आमच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांच्या पार्क केलेल्या दुचाकींवर झाड कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, क्लब रोडच्या मागील बाजूस असलेल्या काळी आमराईत पावसाने एकाचा बळी घेतला. दुचाकीवरून घरी चाललेल्या या व्यक्तीवर झाड कोसळल्याने चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. विजय कोल्हापुरे, वय ६५ असे या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. वाहतूक दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

याचप्रमाणे लिंगराज कॉलेज रोडवरील पोलीस लाईन वसाहतीसमोर विजेचा जुना खांब कोसळला. तेथून जवळच असलेले एक छोटे झाडही पावसामुळे कोसळले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा ठप्प झाला. एकंदर आजच्या अवकाळी पावसाने बेळगावात एकच हाहाकार माजवला आहे.

Tags: