Belagavi

राज्य सौहार्द संयुक्त सहकारी संघाचे विभागीय कार्यालय बेळगावमध्ये २० एप्रिल रोजी होणार कार्यालयाचे उद्घाटन कर्नाटक सौहार्द सहकारी संघाचे अध्यक्ष कृष्णारेड्डी यांची माहिती

Share

कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी नियमित बेंगळुरू यांच्यावतीने बुधवारी बेळगाव आणि कलबुर्गी याठिकाणी विभागीय कार्यालयांचे उद्घाटन होणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन व्हर्च्युअल माध्यमातून होणार आहे अशी माहिती कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी नियमित बेंगळूरचे अध्यक्ष बी एच. कृष्णारेड्डी यांनी दिली आहे.

बेळगाव शहरातील वार्ताभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक राज्यात दोन सहकारी कायदे असून १९५६ आणि १९९७ सालचे दोन कायदे सध्या राज्यात सुरु आहेत. राज्यात सुमारे ४६ हजार सहकारी संघ कार्यरत असून २.२५ कोटी जनता सहकारी क्षेत्राशी निगडित आहे. सौहार्द कायद्यांतर्गत ५५०० संस्था तर ५० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.राज्यातील प्रत्येक तालुक्यात सौहार्द संस्था कार्यान्वित असून स्वतंत्र भारतात सहकार क्षेत्राला मान्यता नव्हती. मात्र, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्याला मान्यता देऊन सहकार मंत्रालय स्थापन केले आहे . याअंतर्गत गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून व्हर्च्युअल पद्धतीने या कार्यालयांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. १ एप्रिल रोजी केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन देखील अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे, असे कृष्णारेड्डी यांनी सांगितले.

कृष्णारेड्डी पुढे बोलताना म्हणाले, बेंगळुरू, बेळगाव, गुलबर्गा, म्हैसूर येथे हि कार्यालये संपूर्णपणे तयार आहेत. बेळगावमधील ऑटोनगर येथे नूतन कार्यालयाच्या इमारतीची निर्मिती करण्यात आली असून बुधवारी या कार्यालयाचे उद्घाटन सहकार मंत्री एस टी सोमशेखर यांच्याहस्ते होणार आहे. जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती तिन्ही दिली.

Tags: