Belagavi

स्त्री हे शक्तीचे दुसरे स्वरूप : विजयालक्ष्मी बाळेकुंद्री

Share

स्त्री हि केवळ मातृ रूपातच नाही तर शक्ती, दया, क्षमा, श्रद्धा या साऱ्या स्वरूपात आढळते असे प्रतिपादन प्रसिद्ध वैद्य डॉ. विजयालक्ष्मी बाळेकुंद्री यांनी केले.

बेंगळुरू येथील कुमार पार्क येथे आज सकाळी सिरीगन्नड महिला वेदिकेच्या वतीने राज्यस्तरीय महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री डॉ. बी टी ललितनायक आणि प्रसिद्ध वैद्य डॉ. विजयालक्ष्मी बाळेकुंद्री यांच्याहस्ते या संमेलनाचे उद्घाटन पार पडले.

कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. विजयालक्ष्मी बाळेकुंद्री उपस्थितांना उद्देशून बोलताना म्हणाल्या, स्त्री हि केवळ मातृ रूपातच नाही तर शक्ती, दया, क्षमा, श्रद्धा या साऱ्या स्वरूपात आढळते. तामिळनाडूचे लोक म्हणतात की आमची तमिळ ही प्राचीन भाषा आहे परंतु तमिळसाठी वापरलेले व्याकरण कन्नडमधून घेतले आहे. कन्नड भाषिकांनी कन्नड भाषेचा अभिमान बाळगावा, कन्नड भाषेला प्राचीन सांस्कृती आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या संमेलनात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये राधाबाई शिराली, मालती मैसूर, ए बी रुद्रम्मा, अनुपमा सुलाखे, जयश्री चुंमारी, विजया शेट्टी, शांता जयानंद, शुभा विष्णू सभाहीत, माळा चलुवनहळ्ळी, ज्योती हेब्बर, शैला कोक्करी, राजश्री धळंग, विना सुधींद्र, जयश्री मनमली, गीता सालीमठ, ज्योती कुलकर्णी, रूपा पाटील, सुवर्णा बंडी, गीता मंजुनाथ, श्वेता मोहन, उमेश सी एन, सर्वमंगला तसेच बाल पुरस्कार देऊन पूर्वी शेट्टी, नित्या हुनसिगिडद, प्रणती पी, चैतन्य टीएस, यशस्विनी, मधुरा ए, दिगंत प्रसाद आदींना गौरविण्यात आले. (फ्लो)

यावेळी डॉ. बी टी ललितनायक यांनी महिलांसंदर्भात कौतुकास्पद प्रतिक्रिया व्यक्त करत मुलांना योग्य संस्कार, संस्कृती शिकविणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले.

यावेळी भ्रमरांभ वेंकटरमनय्या, रंगभूमी आणि चित्रपट कलाकार मालश्री, सिरीगन्नड महिला वेदिकेच्या राज्याध्यक्षा राजांनी अशोक जिरग्याळ, ए हेमागंगा, एम जी देशपांडे, एम आर नागराज, व्ही बी कुळमर्व, डॉ. सौगंधिका जॉईस, कविता हेब्बार, पद्मा श्रीधर, सिरीगन्नड महिला वेदिकेच्या सदस्या आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: