Belagavi

रत्नाकर शेट्टी स्मृती क्रिकेट स्पर्धा : अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्सचा ४ गड्यांनी विजय

Share

बेळगावात सुरु असलेल्या के. रत्नाकर शेट्टी स्मृती क्रिकेट स्पर्धेत आजच्या सामन्यांत अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने विजय मिळवला.

युनियन जिमखाना मैदानावर आज झालेल्या सामन्यात साईराज वारियर्स आणि अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघादरम्यान लढत झाली. नाणेफेक जिंकून अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजी करताना साईराज वारियर्स संघाने 117 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने 18.3 षटकांत 6 गडी गमावून 118 धावांचे उद्दिष्ट गाठत 4 गड्यानी स सामना जिंकला. अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाच्या वैष्णव संघमित्रा याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Tags: