बेळगावातील ऍपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅबिलिटी अकॅडेमिने आणखी विध्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन अवकाशात भरारी घेण्याची संधी देण्याचा निर्धार केला आहे.

: होय, उत्तर कर्नाटकात बेळगावातील ऍपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅबिलिटी अकॅडेमिने या भागातील विध्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण देऊन हवाईप्रवास सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद बामणे आणि ज्योती बामणे विध्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवसरात्र परीश्रम घेत आहेत. या वर्षीही त्यांनी सुमारे 6 विध्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण दिले, त्यांची विविध एअर कंपन्यांत आणि विमानतळांवर प्लेसमेंटसाठी निवड झाली आहे. शिरसी येथील तस्मिया मुल्ला हिची एअर एशियामध्ये केबिन क्रू म्हणून निवड झाली आहे. त्याचप्रमाणे इंडिगो कंपनीने बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुस्कान मुल्ला, शिवशंकर के., जी. एस. दामोदरन यांची नियुक्ती केली आहे. हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून प्रवीण सदलगी आणि शुभांगी गिरबिडे यांची नियुक्ती झाली आहे. आज या सगळ्यांचा अकॅडेमीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते या सर्व विध्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. 
त्यानंतर बोलताना प्रमुख पाहुणे पाहुणे केएलई बी. व्ही. बेल्लद कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंह यांनी विध्यार्थ्यांना उद्देशून बोलताना ऍपटेक संस्थेत तुम्ही जे प्रशिक्षण घेतले आहे त्याचा तुम्हाला भविष्यात चांगला उपयोग होणार आहे, या ज्ञानाचा वापर करून आणखी उच्च शिक्षण घेऊन ऍपटेक संस्थेचे नाव उज्वल करा असे आवाहन केले. 
यावेळी बोलताना आणखी एक प्रमुख पाहुण्या रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या सदस्या कीर्ती सुरंजन म्हणाल्या, या नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेकजण ग्रामीण भागातील आहेत. त्यांना हवाईसेवा क्षेत्रातील सेवांचे उत्तम, दर्जेदार प्रशिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्वल करण्याचे श्रेय संस्थाचालक विनोद आणि ज्योती बामणे यांना जाते असे सांगितले. 
यावेळी आमच्या ‘आपली मराठी’सोबत संवाद साधून विध्यार्थी आणि संस्थाचालकांनी ऍपटेक संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती दिली. एकंदर बेळगावचे सुपुत्र असलेले विनोद बामणे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी धडपडत आहेत. आगामी काळात या संस्थेमधून आणखी विध्यार्थी चांगले, दर्जेदार प्रशिक्षण घेऊन बाहेर पडावेत, त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे अशा शुभेच्छा देऊयात !


Recent Comments