Nippani

निपाणी तालुक्यातील भिवशी गावात तहसीलदारांचे ग्रामवास्तव्य

Share

कर्नाटक सरकारच्या वतीने ग्रामविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ग्रामवास्तव्य अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या अभियानात निपाणी तालुक्यातील भिवशी गावात तहसीलदार मोहन भस्मे यांनी ग्रामवास्तव्य करून गावातील जनतेशी संवाद साधला.

निपाणी तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या अभियानाचा हा आठवा टप्पा असून सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत तहसीलदारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदारांसमवेत महसूल अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच कृषी विभाग, भूमापन, तालुका पंचायत, एपीएमसी, सार्वजनिक बांधकाम, सिंचन, बाळ विकास आणि महिला कल्याण, पशुसंगोपन, हेस्कॉम आदी विभागातील अधिकारीदेखील उपस्थित होते.उपस्थित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी गावातील समस्यांसंदर्भात माहिती देत या समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली. गावात असणाऱ्या सर्व त्रुटी दूर सारून मरण उतारा, आरोग्य विभागातील सुविधा यासह सरकारी योजना पोहोचविण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्याची विनंतीही करण्यात आली. याचप्रमाणे गावातील स्मशानभूमी, आश्रय योजनांतर्गत मिळणारा लाभ, सरकारी जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण अशा अनेक विषयांवर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. ()

Tags: