ठेकेदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येच्या तपासासाठी बेळगावला भेट दिलेल्या उडुपी पोलिसांनी बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्राम पंचायतीला भेट देऊन अधिकाऱ्यांची चौकशी चालवली आहे.

उडुपीचे पोलीस निरीक्षक शरणगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने सोमवारी हिंडलगा ग्रापंला भेट देऊन ठेकेदार संतोष पाटील आत्महत्येबाबत चौकशी केली. वर्क ऑर्डर नसताना संतोष पाटील यांना तब्बल ४ कोटी रुपये खर्चाची १०८ विकासकामे कशी काय करू दिली असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांनी विचारला. याबाबत ग्रापं अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती तपास अधिकारी घेत आहेत.


Recent Comments