Belagavi

रामनाथ मंगल कार्यालयात पादुका दर्शन कार्यक्रम

Share

बेळगावातील अनगोळ क्रॉसवरील रामनाथ मंगल कार्यालयात रविवारी महाराष्ट्रातील रामानंदाचार्य दक्षिण पीठाचे श्री जगद्गुरू रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्यस्वामीजी यांच्या पादुका दर्शनाचा कार्यक्रम पार पडला.

होय, आज महाराष्ट्राचे रामानंदाचार्य दक्षिण पीठाचे श्री जगद्गुरु रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्यस्वामीजी यांच्या पादुका दर्शन कार्यक्रम बेळगावातील अनगोळ क्रॉस येथील रामनाथ मंगल कार्यालयात आयोजित केला होता. व्यासपीठावरील पुरोहितांनी पादुका दर्शनाचे महत्त्व भाविकांना सांगितले. फ्लो

यासंदर्भात ‘आपली मराठी’ला माहिती देताना प्रकाश सकपाळ म्हणाले, रामानंदाचार्य दक्षिण पीठ श्री जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यस्वामीजी यांच्या पादुका दर्शन गुरुपूजा कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे. स्वामीजींच्या सिद्ध पादुका आज येथे आल्या आहेत. त्यांचे पूजन भक्तांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर त्यानी स्वामीजींच्या ऑनलाइन प्रवचनाची माहिती दिली. बाईट

जिल्हा सेवादलाचे अध्यक्ष अरविंद टोन्ने यांनी सांगितले की, रामनाथ मंगल कार्यालयात स्वामी नरेंद्राचार्यस्वामीजी यांचा पादुका दर्शन गुरुपूजा कार्यक्रम पार पडला. यानिमित्त सकाळी सत्संग सोहळा झाला. नंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. ते पुढे म्हणाले की, भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले असून श्रींचे सायंकाळी ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. बाईट

यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी पवित्र पादुकांचे दर्शन घेतले.

 

Tags: