माजी मंत्री एस. के. बेल्लूब्बी पुढील निवडणुकीत निवडून यावेत अशी प्रार्थना करून त्यांच्या समर्थकांनी रथावर केळी फेकली.

विजापूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी मतदारसंघातील कोल्हार शहरात पार पडलेल्या कोल्हार दिगंबरेश्वर मठाच्या यात्रेनिमित्त शनिवारी रथोत्सव पार पडला. यावेळी भाजप नेते व माजी मंत्री एस. के. बेल्लूब्बी पुढील निवडणुकीत निवडून यावेत अशी कामना करून त्यांचे समर्थक पद्मना सोन्नद आणि मित्रांनी केळ्यांवर आपली इच्छा लिहून ती केळी रथावर उडवली. याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


Recent Comments