Vijayapura

वाहनधारकांसाठी विजापूर पालिकेची ‘आयडियाची कल्पना !’

Share

दुष्काळी विजापूर जिल्हा तेथील कडक उन्हासाठीही कुप्रसिद्ध आहे. उन्हाच्या झळांनी विजापूरकर हैराण झाले आहेत. त्यामुळे सिग्नलवर मिनिटे उन्हात थांबणे जणू अग्निदिव्यच ठरत आहे. यावर विजापूर महानगरपालिकेनेआयडियाची कल्पनाचालवत उपाय शोधला आहे.

विजापूर शहरात उन्हामुळे चौकातील सिग्नलवर २-३ मिनिटे थांबणे वाहनधारकांना जिकिरीचे होत आहे. उन्हाच्या झळांमुळे ते घामोघाम होऊन जात आहेत. यावर उपाय म्हणून विजापूर महानगरपालिकेने वाहनधारकांना सावलीची सोय केली आहे. शहरातील वर्दळीच्या बसवेश्वर टॅंक, गांधी चौक आदी ट्रॅफिक सिग्नल्सवर चारही बाजूने जुळणाऱ्या रोडवर 12मीटर बाय 30 मीटर आकाराचे हिरवे छत बांधण्यात आले आहे. रस्त्यावर उंचावर बांधलेल्या या छतामुळे चौकातील सिग्नल्सवर थांबणाऱ्या वाहनधारकांना सावली मिळण्याची चांगलीच सोय झाली आहे. वाहनधारकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Tags: