भाजपमध्ये हलाल होऊन ईश्वरप्पा यांचा पहिला बळी गेला आहे. त्या पक्षात आता हलाल होणाऱ्यांची रांग लागणार आहे अशी बोचरी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केली.

बेळगावात शनिवारी पत्रकारांशी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी म्हणाले, भाजपमध्ये सर्वप्रथम हलाल होऊन ईश्वरप्पा यांचा बळी गेला आहे. त्या पक्षात हलाल होणाऱ्यांची आता रांग लागणार आहे. कोविड काळात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार भाजपने केलाय. अजून बरेच मंत्री भ्रष्टाचारामुळे हलाल होणार आहेत. राज्य सरकार ४०% कमिशनवर चालले आहे. ईश्वरप्पा याना अटक होईपर्यंत काँग्रेस आंदोलन सुरूच ठेवील असेही जारकीहोळी म्हणाले.


Recent Comments