Belagavi

बेळगांव सकल मराठा समाजातर्फे येत्या 15 मे रोजी गुरुवंदना

Share

बेळगांव सकल मराठा समाजातर्फे येत्या 15 मे रोजी गुरुवंदना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या प्रचार प्रसारासाठी पत्रकाचे अनावरण मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी डॉ. समीर कुट्रे, डॉ. अनिल पोटे, रमाकांत कोंडुस्कर, मिलिंद भतकांडे, विजय पाटील, अनंत लाड, डॉ. मिलिंद हलगेकर, जयवंत खन्नूकर, विशाल कंग्राळकर व सागर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पत्रकाचे पूजन करून शहरातील काही ऑटो रिक्षांवर पत्रके लावून प्रचार कार्याला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी कार्यक्रमाचा उद्देश व स्वरूप स्पष्ट केला. गुरुवंदना हा कार्यक्रम 15 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मराठा समाजाचे स्वामी श्री. मंजुनाथ स्वामी हे समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम वडगाव येथील आदर्श विद्यामंदिराच्या प्रांगणात होणार आहे. कार्यक्रमापूर्वी मंजुनाथ स्वामीजींची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता कपिलेश्वर मंदिरापासून मिरवणूक सुरु होणार आहे. त्यानंतर स्वामीजींचा सत्कार समारंभ होईल, असे किरण जाधव यांनी सांगितले.

दरम्यान रमाकांत कोंडुस्कर, मिलिंद भातकांडे, विजय पाटील, अनंत लाड आदींनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

 

 

 

Tags: