Belagavi

बेळगावात ‘हेरिटेज ऑफ कोल्हापूर’ वस्तू प्रदर्शन आणि विक्री मेळावा प्रारंभ 

Share

बेळगावातील मिलेनियम गार्डनमध्येहेरिटेज ऑफ कोल्हापूरया वस्तू प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन केले आहे. शनिवारी त्याचे समारंभपूर्वक उदघाटन करण्यात आले.

होय, बेळगाव आणि कोल्हापूरचे एक अविभाज्य नाते आहे. कोल्हापूरच्या खास शैलीतील वस्तू खरेदी करण्यासाठी बेळगावकरांना कोल्हापूरला जावे लागते. पण आता बेळगावातच कोल्हापूरच्या पारंपरिक शैलीच्या, पद्धतीच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोल्हापूरची पारंपरिक शैली आपल्या खास वैशिष्ट्यांसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. या खास शैलीतील कोल्हापुरी वस्तू घेऊन महाडिक परिवार बेळगावकरांच्या भेटीस आला आहे.

बेळगावकरांसाठी खास कोल्हापुरी वस्तू-साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री मेळावा त्यांनी मिलेनियम गार्डनमध्ये भरविला आहे. शनिवारी कर्नल ए. व्ही. जाधव, अंजली जाधव, उद्योजक पूनम गुलबानी, प्रेरणा मुचंडी, शुभांगी जिनगौडा, शिल्पा मदली, आशा घार्गे यांच्याहस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले.

प्रदर्शन व विक्री मेळाव्याच्या आयोजिका अरुंधती धनंजय महाडिक यावेळी बोलताना म्हणाल्या, कोल्हापूरला स्वतःची अशी खास सांस्कृतिक ओळख, परंपरा आहे. त्यामुळे बेळगावकरांना विविध प्रकारचे शर्ट्स, टी शर्ट्स, महिलांचे विविध सुंदर डिझाइन्सची वस्त्रप्रावरणे, कोल्हापुरी ज्वेलरी, मसाल्याचे पदार्थ, होम डेकोर सिस्टीम आणि खास कोल्हापुरी थाटाच्या विविध ब्रॅण्ड्स वस्तू आम्ही या प्रदर्शनात घेऊन आलो आहोत. बेळगावकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी मयुरा माने, शशिकला माने, स्मिता पित्रे, अंजली मोहिते व अन्य उपस्थित होते.

Tags: