Khanapur

खानापूर शहरात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती केंद्र सुरु

Share

खानापूर येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती केंद्राचे . डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते शनिवारी उदघाटन करण्यात आले. त्यामुळे अखेर खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे.

ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती केंद्र सुरु करण्याची मागणी खानापूर तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीसाठी बेळगाव किंवा धारवाड येथे जावे लागत होते. एवढेच नाही तर ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी या मागणीची दखल घेऊन ऊर्जा मंत्र्यांकडे स्वतः भेटून यासाठी पाठपुरावा केला होता. ऊर्जा मंत्र्यांनी त्यानंतर खानापूरला ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती केंद्र मंजूर केले होते. त्याचे उदघाटन आ. निंबाळकर यांनी केले. यावेळी बोलताना हेस्कॉम सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले की, आ. अंजली निंबाळकर यांनी जातीने लक्ष घालून खानापूर तालुक्यातील ३ वीज उपकेंद्रांसाठी ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती केंद्र मंजूर करवून घेतले आहे. त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे ४० वर्षांहून अधिक जुन्या वीजतारा बदलण्याचे आणि अन्य कामे सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. अंजली निंबाळकर यांचा हेस्कॉमतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी हेस्कॉमचे अधिकारी, कर्मचारी व अन्य उपस्थित होते.

 

 

 

Tags: