Belagavi

बेळगावात हिंदू खाटीक समाजातर्फे बिरदेव यात्रा उत्साहात

Share

बेळगावात शुक्रवारी हिंदू खाटीक समाजातर्फे बिरदेव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद पार पडला.

होय, बेळगावातील बकरी मंडईतील श्री बिरदेव देवस्थानात शुक्रवारी हिंदू खाटीक समाजातर्फे बिरदेव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. समादेवी मंदिरापासून बकरी मंडईतील बिरदेव मंदिरापर्यंत काढलेल्या या सवाद्य मिरवणुकीत खाटीक समाज बांधव, महिला, मुले उत्साहाने सहभागी झाली होती. फ्लो

या संदर्भात माहिती देताना हिंदू खाटीक समाजाचे राज्याध्यक्ष अजित पवार आणि उदय घोडके म्हणाले, बेळगाव शहरातील हिंदू खाटीक समाजातर्फे बिरदेव यात्रा महोत्सव बकरी मंडईतील बिरदेव देवस्थानात आयोजित केला आहे. 7 वर्षानंतर ही यात्रा भरविण्यात आल्याने भक्तांमध्ये उत्साह आहे. उत्साह आणि जल्लोषात भक्तांनी यात सहभागी होऊन पूजा, प्रार्थना करून पालखी सोहळ्यात भाग घेतला. बेळगावात खंडोबाचे मंदिर नाही. ते आम्ही समाजातर्फे बांधण्याचा विचार करत आहोत. देशातील 13 राज्यांत हिंदू खाटीक समाजाचे नागरिक राहतात. त्यांचा एससी प्रवर्गात समावेश केला आहे. केवळ कर्नाटकातच या समाजाचा ओबीसीत समावेश केला आहे. कर्नाटकातही समाजाचा एससी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, बिरदेव यात्रेनिमित्त हिंदू खाटीक समाजातर्फे शुक्रवारी दुपारी मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.

 

Tags: