Vijayapura

विजापुरातील श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान प्रवेशद्वार बांधकामाला प्रारंभ

Share

विजापूर तालुक्यातील तोरवी या गावातील लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या प्रवेशद्वार बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याहस्ते पार पडला.

केंद्रीय कोळसा खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज विजापूर तालुक्यातील तोरवी या गावातील लक्ष्मी नरसिंह देवस्थानाला भेट दिली. यावेळी या देवस्थानाच्या दरवाजाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी देवस्थानात प्रल्हाद जोशी यांनी सहकुटुंब विशेष पूजा केली. शहर विकास प्राधिकरणातर्फे ७.८५ लाख रुपयांच्या कामकाजाचे भूमिपूजन करण्यात आले.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रल्हाद जोशी म्हणाले, या देवस्थानाची आपल्यावर मोठी कृपा आहे. आज याठिकाणी सहकुटुंब आपण पूजेसाठी आलो असल्याचे ते म्हणाले.

Tags: