Belagavi

मंत्री निरानी यांची पाटील कुटुंबाला दिली वैयक्तिक ५ लाखांची मदत

Share

बृहत मध्यम उद्योग मंत्री मुरुगेश निरानी यांनी आत्महत्या केलेल्या कंत्राटदार संतोष पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मंत्री मुरुगेश निरानी यांनी गुरुवारी सायंकाळी बेळगाव तालुक्यातील बडस गावातील संतोष पाटील यांच्या घरी जाऊन दुःखी कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी मुरुगेश निरानी यांनी ५ लाख रुपयांची वैयक्तिक मदत या कुटुंबाला दिली.

त्यानंतर बोलताना मंत्री मुरुगेश निरानी म्हणाले, पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून धीर दिला. संतोष पाटील यांची पत्नी पदवीधर आहे. तिला सरकारी नोकरी देण्याची विनंती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संतोष पाटील यांनी केलेल्या विकासकामांची प्रलंबित बिले देण्यासाठी शासन कार्यवाही करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी मंत्री निरानी यांच्यासमवेत माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.

 

Tags: