राज्यात दोन सीडी कारखाने आहेत.यात भाजपमधील एक मूर्ख युवा नेते आणि काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांसहित सामील आहेत, असा अप्रत्यक्ष टोला बी वाय विजयेंद्र तसेच डीकेशी यांना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी लगावलाय.

विजापूर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी आपली प्रतिक्रिया नोंदविली. याप्रकरणी सीबीआय तपास व्हावा, याप्रकरणी रमेश जारकीहोळी यांनी केलेल्या वक्तव्याला सहमती दर्शवत भाजपमधील एक मूर्ख युवा नेते आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते या प्रकरणात सहभागी असल्याचा गंभीर आरोप देखील यत्नाळांनि केलाय. काँग्रेसमध्ये एक टीम आहे भाजपमध्ये एक टीम आहे. भाजपमधील चोर आहेत आणि काँग्रेसमधील महाचोर आहेत, दोघंही मिळून अशी षड्यंत्र रचत आहेत, असे ठोस विधान त्यांनी मांडले आहे.
ईश्वरप्पा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची घोषणा केली आहे. हे काँग्रेसच्या अधोगतीचे लक्षण असून केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या तोंडून बोलावून घेतले जात आहे. यामागे षडयंत्र असून यामागे असलेल्या काँग्रेस व्यूहाचा तपास घेण्यात यावा, असे मत त्यांनी मांडले आहे. रामकृष्ण हेगडे, एस एम कृष्णा, डी देवराज अरस यांचे राजकारण आपण पहिले आहे. सिद्धरामय्या यांच्याबद्दल देखील आपल्याला आदर आहे. इतक्या नीच दर्जाचे राजकारण ते करणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी कौतुक देखील केले. काँग्रेस हताश होत असून कर्नाटकचे सुसंस्कृत राजकारण आता घृणास्पद होत असल्याचे ते म्हणाले.
यत्नाळ पुढे म्हणाले, सर्व पक्षात आता चोर, गुंड, लुटारू आहेत. सीडी प्रकरण, ब्लॅकमेल प्रकरण करून नीच राजकारण करण्यात येत असून बंगळूरमध्ये अशापद्धतीच्या कामासाठी टीम कार्यरत असल्याचेही ते म्हणाले.भाजपमध्येच कार्यरत असलेले आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ हे नेहमीच विरोधकांसह आपल्या पक्षाच्यासंदर्भात देखील अनेकवेळा स्पष्ट विधान करताना आढळून येतात. राज्यात सध्या सुरु असलेल्या संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपच्या बी वाय विजयेंद्र आणि काँग्रेसच्या डी के शिवकुमार यांनाही त्यांनी एकाच जात्यात भरडले आहे.


Recent Comments