बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२१च्या पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार-२०२१’ करिता मराठी विभागासाठी दै. तरुण भारतचे गोवा येथील निवासी संपादक सागर जावडेकर यांना तर कन्नड विभागासाठी न्यूज हंटचे वार्ताहर चंद्रशेखर चिनकेकर यांना जाहीर झाला आहे. ‘प्रा. एस. आर. जोग ,महिला पत्रकार पुरस्कार-२०२१’ मराठी विभागासाठी साप्ताहिक सहकार दर्शन बेळगावच्या व्यवस्थापकीय संपादिका सौ. वसुधा सांबरेकर व कन्नड विभागासाठी दै. प्रजावाणीच्या हुबळी ब्युरो चीफ रश्मी एस. यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गणपत गल्ली, बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात रविवार दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेच्या उदघाटन समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष रघुनाथ बांडगी यांनी कळविले आहे.


Recent Comments