संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रमेश जारकीहोळी यांना आव्हान दिले असून सोमवार पर्यंत पुरावे जाहीर करण्याची वाट न पाहता तात्काळ जाहीरपणे पुरावे दाखवावेत, असे आव्हान दिले आहे.

सीडी प्रकरणात सहभाग असलेल्या टोळीचा संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाशी संबंध आहे असा गौप्यस्फोट करणाऱ्या रमेश जारकीहोळी यांना ग्रामीण आमदारांनी टोला लगावला आहे. या प्रकरणाशी संबंधित पुरावे सोमवारी जाहीर करू असे सांगणाऱ्या रमेश जारकीहोळींनी तातडीने पुरावे दाखवावेत. सोमवार पर्यंत ताटकळत ठेवू नये. हा सारा प्रकार प्रसारमाध्यमांमध्ये कुतूहल निर्माण करण्यासाठी करण्यात येत असून अशा पद्धतीची बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत असा टोला हेब्बाळकरांनी लगावला आहे.
आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया देताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, संतोष पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपण आंदोलन केले. के एस ईश्वरप्पा यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक व्हावी. असे हेब्बाळकर म्हणाल्या. तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलेल्यांचे रक्षण कशासाठी करण्यात येत आहे?सर्वसामान्यांचे हित कशात आहे हे? असा सवाल उपस्थित करून प्रत्येक विभागातील कंत्राटदार सध्या अडचणीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी १७ एप्रिल रोजी बेळगाव शहरात भव्य आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहितीहि हेब्बाळकरांनी दिली.
हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी २ वेळा ईश्वरप्पाची भेट घेतल्याचे काबुल केले आहे. रमेश जारकीहोळी यांनी काम झाल्याचे सांगितले आहे. संतोष हे भाजपचे कार्यकर्ते नसल्याचे सांगितले जात आहे. भाजपात हा सारा गोंधळ सुरु असून सर्वप्रथम हा गोंधळ आधी नीट करा असा टोला त्यांनी लगावलाय. संतोष पाटील ज्यावेळी हे कामकाज करत होते त्यावेळी रमेश जारकीहोळी जिल्हा पालकमंत्रिपद कार्यरत होते. यावेळी १० वेळा आपण त्यांनी बोलावण्याचा प्रयत्न केला. तालुका पंचायत सभेत प्रस्ताव देखील मांडला. संतोष पाटील यांनी आपण रमेश जारकीहोळी यांचे फॉलोवर आहोत असे सांगितले. तर मग काम कोणी केले? प्रलोभने कुणी दाखविली? आणि आश्वासनावर संतोष पाटील यांनी काम केले का असे अनेक प्रश्न आमदारांनी उपस्थित केले.
१०८ कामकाजांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, माझ्या या विधानाला ट्रोल केले जात आहे. याचेही मी स्वागतच करत असून माझ्या विधानापासून मी मागे हटणार नाही. ही जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांची नाही.कोणत्या विभाग अंतर्गत हे कामकाज झाले आहे यासंदर्भात जाणून घेण्यासाठी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांची तीनवेळा भेट घेण्यात आली आहे. ईश्वरप्पांच्या आशेवर संतोष पाटील यांनी काम केले असून यासंदर्भात हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्षांविरोधात तपास करण्याचा आग्रह आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.


Recent Comments