Belagavi

भाजप सरकारने शिक्षकांच्या समस्या सोडवल्या नाहीत : एन. बी. बन्नूर

Share

 राज्यात भाजप सरकार आल्यानंतरही शिक्षकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत असा आरोप वायव्य शिक्षक मतदार संघातील काँग्रेस उमेदवारी एन. बी. बन्नूर यांनी केला

शुक्रवारी बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस उमेदवार बन्नूर म्हणाले, भाजप शिक्षक प्रतिनिधी एमएलसी अरुण शहापूर हे गेल्या ४-५ महिन्यांपासून नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रचाराच्या नावाखाली राज्यातील शिक्षकांचा दुरुपयोग करून घेत कार्यशाळा, कार्यक्र्म करत आहेत. शिक्षकांकरवी निवडणुकीचा प्रचार करत आहेत हे चुकीचे आहे.

खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांतील शिक्षकांची वेतन समस्या बिकट आहे. त्या शिक्षकांचा पगार वाढविणे सरकारला जमेना झाले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या नावाखाली शिक्षणमंत्रीच निवडणूक प्रचार करत आहेत. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणीही बन्नूर यांनी केली.

यावेळी काँग्रेस नेते जगदीश सावंत, के. बी. हिरेमठ, प्रभू शिवनायक, जी. एन. पाटील आदी उपस्थित होते.

 

Tags: