Vijayapura

ठेकेदार संतोष पाटील आत्महत्येमागे काँग्रेसचा हात! : प्रल्हाद जोशी

Share

ठेकेदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरण मागे काँग्रेसचा हात असून त्यांच्या हावभावावरून हि बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, मंत्री ईश्वरप्पा यांचा राजीनामा पक्षाने जड अंतःकरणाने स्वीकारला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

विजापूर जिल्ह्यातील तोरवी येथे लक्ष्मी नरसिंह देवस्थानात दर्शनासाठी आलेल्या प्रल्हाद जोशींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ईश्वरप्पांनी आपल्यावर झालेल्या आरोपातून निर्दोष मुक्त होण्याच्या विश्वासाने राजीनामा दिला असून यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप प्रल्हाद जोशींनी केला. सीडी प्रकरणाच्या मागे कार्यरत असणाऱ्या टोळीचाही पर्दापाश व्हावा, याचा तपास व्हावा, तपासाअंती सत्य उजेडात येईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून रिक्त मंत्रीपदे मुख्यमंत्री भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ईश्वरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर एकूण पाच मंत्रीपदे रिक्त असून या पदावर लवकरच नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जोशींनी दिली. विजापूर जिल्ह्याला मंत्रिपद देण्याच्या विचारावर प्रतिक्रिया देताना प्रल्हाद जोशी म्हणाले, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्धार केला आहे. कोणाला मंत्रिपद द्यायचे यासंदर्भात हायकमांड निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.विजापूर येथे प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी काँग्रेस कडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर प्रत्युत्तरादाखल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी या प्रकरणामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे.

Tags: