Belagavi

संतोष पाटील यांची आत्महत्या दुर्दैवी; कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी : कारजोळ

Share

 ठेकेदार संतोष पाटील यांची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया जलसंसाधन खात्याचे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज दिली. त्याचबरोबर या घटनेवरून कणी राजकारण करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

बेळगावात गुरुवारी आंबेडकर उद्यानात मंत्री कारजोळ पत्रकारांशी बोलत होते. संतोष पाटील यांच्या अंत्यक्रियेला निदान माणुसकीच्या दृष्टीने तरी का गेला नाहीत? या प्रश्नावर कारजोळ म्हणाले, कालच आमचे मंत्री पाटील यांच्या घरी जाऊन आले आहेत. आज सकाळी संतोष पाटील यांचा मृतदेह त्यांच्या गावात आल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या दुःखद प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. संतोष पाटील यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे कारजोळ यांनी स्पष्ट केले.   एकंदर, संतोष पाटील यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे मंत्री गोविंद कारजोळ यांनी यावेळी सांगितले.

 

Tags: