Banglore

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

Share

 भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नमन केले

होय, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बेंगळूर येथे विधानसौधसमोरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी समाज कल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी,उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण, आ. मुनिरत्न, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, बृहत बेंगळूर महानगरपालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: