संविधानाचे शिल्पकार डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त बेळगावात आंबेडकरांच्या एका चाहत्याने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून चांगला निर्धार केला आहे.

होय, बेळगाव येथील चव्हाट गल्लीचे रहिवासी असलेले आंबेडकरांचे चाहते टिक्काप्पा लक्ष्मण कोलकार यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त डोळे दान करण्याचा संकल्प सोडला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती कार्यक्रमाचे गुरुवारी शहरातील आंबेडकर गार्डन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्या उपस्थितीत कोलकार यांनी याची घोषणा केली.
बिम्स हॉस्पिटलच्या नेत्रपेढीला डोळे दान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बिम्सच्या प्रशासकीय अधिकारी आफ्रीनाबानू बळ्ळारी यांनी कोलकर यांना नेत्रदान नोंदणीपत्र सुपूर्द केले. याबाबत बोलताना टिक्काप्पा कोलकार म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी महान संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त मी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मला खूप आनंद झाला आहे.
एकंदर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपले दोन्ही डोळे मरणोत्तर दान करण्याचा संकल्प करून कोलकार यांनी अनोख्या पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.


Recent Comments