हुक्केरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हुक्केरी शहरातील आंबेडकर नगर येथे तहसीलदार डॉ. डी. एच हुगार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. विविध सांस्कृतिक वाद्यवृंदांच्या उपस्थितीत मिरवणूक पार पडली.
तालुका प्रशासन, समाज कल्याण विभाग आणि हुक्केरी – संकेश्वर नगरपालिका, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बेळवी येथील शरण बसवदेव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी व्यासपीठावर नगरपालिका अध्यक्ष अण्णाप्पा पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती, बेळगाव जिल्हा अनुसूचित जाती जमातीचे प्रभारी सदस्य सुरेश तळवार, विभागीय सदस्य रमेश हुंजी आदी उपस्थित होते. यानंतर के सी आखता आणि विद्राभद्रप्पा कुंभार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात उपास्तीतांना उद्देशून बोलताना डॉ. दूंडाप्पा हुगार म्हणाले, भगवान महावीर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही म्हण व्यक्ती आहेत. त्यांची तत्वे, सिद्धांत आणि आदर्श आपल्या जीवनात अंगिकारले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
समाज कल्याण सहायक संचालक उमेश सिदनाळ बोलताना म्हणाले, तालुका प्रशासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले आहे. डॉ. बाबाहेबांच्या आदर्शांचे पालन प्रत्येकाने आपल्या जीवनात करणे गरजेचे असून डॉ. बाबासाहेबांचे आदर्श हे समाजाच्या विकासासाठी महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.()
यावेळी हुक्केरी, संकेश्वर नगरपालिका सदस्य, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, तालुकास्तरीय अधिकारी, विविध दलित संघटनांचे नेते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.


Recent Comments