Hukkeri

स्वामित्व योजनेचा लाभ घ्या : उमेश कत्ती

Share

केंद्र आणि राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या स्वामित्व योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन वन आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी केले.

हुक्केरी तालुक्यातील अम्मनगी गावात ग्रामस्थांना पंचायत राज खात्यातर्फे स्वामित्व योजनेंतर्गत मालमत्ता हक्कपत्रांचे वाटप मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते झाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री कत्ती म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांना त्यांची मालमत्ता, जमीन, तिचा विस्तार, मोजमाप याची खरी माहिती कळावी यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगाने स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ घेऊन ग्रामस्थांनी आपापल्या मालमत्तांची हक्कपत्रे मिळवावेत. यामुळे मालमत्तेशी संबंधित वादविवादही उदभवणार नाहीत. ग्राम वन योजनेतून देखील ग्रामस्थांना अनेक सुविधा सरकार उपलब्ध करून देत आहे. त्यांचाही लाभ ग्रामस्थानी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. बाईट

यावेळी भू-दाखले विभागाचे सहायक संचालक शशिकांत हेगडे यांनी मंत्री उमेश कत्ती यांचा सत्कार केला. फ्लो  यावेळी तालुका पंचायत मुख्याधिकारी उमेश सिदनाळ, एपीएमसी अध्यक्ष प्रशांत पाटील, रेश्मा डाळी, परशुराम डाळी, राजू हुद्दार आदी उपस्थित होते.

Tags: