Belagavi

बेळगावात अग्निशामक दल हुतात्मा दिन गांभीर्याने

Share

 अग्निशामक दलातर्फे बेळगावात गुरुवारी अग्निशामक दल हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला

होय, बॉम्बे डॉकयार्डमध्ये जहाजाला लागलेल्या आगीत अग्निशामक दलाचे ७१ जवान होरपळून मरण पावले होते. त्यादिवशी एप्रिलची १४ तारीख होती. त्यामुळे त्या जवानांच्या स्मरणार्थ देशभर दरवर्षी १४ एप्रिल रोजी अग्निशामक दल हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर बेळगावातही आज अग्निशामक दल हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. अटलबिहारी वाजपेयी मार्गावरील ङ्गिशमक दलाच्या मुख्य कार्यालयात हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा अग्निशामक दल अधिकारी शशिधर निलगार, व्ही. एस. टक्केकर यांच्यासह अग्निशामक दलाचे कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना जिल्हा अग्निशामक दल अधिकारी व्ही. एस. टक्केकर म्हणाले, १४ एप्रिल रोजी बाँम्बे डॉकयार्डमध्ये जहाजाला तेलगळतीने लागलेली आग विझविताना ७१ अग्निशामक दल जवानांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या जवानांच्या स्मरणार्थ आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आजचा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर अग्निशामक दलातर्फे साजरा करण्यात येतो. यानिमित्त बेळगाव अग्निशामक दलातर्फे आजपासून २० एप्रिलपर्यंत अग्निशामक दल सप्ताह पाळण्यात येणार असून आग लागू नये यासाठी काय काळजी घ्यायची, आग प्रतिबंधक यंत्रणा कशी राबवायची आदींबाबत जागृतीपर कार्यक्रम आयोजित केले आहेत.

यावेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Tags: