Bailahongala

‘त्या’ छायाचित्राबाबत महंतय्या स्वामींचा खुलासा

Share

संतोष पाटील, मंत्री ईश्वरप्पा आणि इतर मान्यवरांसोबत असलेले छायाचित्र सध्या व्हायरल झाला आहे. या छायाचित्रामध्ये बैलहोंगल आराध्यामठाचे महंतय्या स्वामीजी देखील दिसत आहेत. हे छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा रंगत असून यासंदर्भात महंतय्या स्वामींनी खुलासा केला आहे.

मृत संतोष पाटील आणि आपला काहीही संबंध नाही, शिवाय त्या छायाचित्राशीही आपला काही संबंध नाही. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये बैलहोंगल येथे झालेल्या दुर्गादेवी यात्रोत्सवाचे आमंत्रण देण्यासाठी मंत्री ईश्वरप्पा यांची भेट घेण्यासाठी आपण गेलो होतो. यावेळी त्याठिकाणी संतोष पाटील हे देखील उपस्थित होते. संतोष पाटील यांनी आपण बैलहोंगलचे स्वामी आहात का असा प्रश्न विचारला त्यावेळी आपली केवळ ओळख झाली. आपल्यासोबत एक छायाचित्रा काढून घेण्यासाठी त्यांनी बोलावले आणि त्यावेळी आम्ही सर्वांनी मिळून छायाचित्र घेतले.. परंतु संतोष पाटील आणि सदर आत्महत्या प्रकरण याच्याशी आपला काहीही संबंध नाही असा खुलासा स्वामींनी केला.

संतोष पाटील यांचा मंत्री ईश्वरप्पांसमवेत असलेले छायाचित्र प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या छायाचित्रामध्ये महंतय्या स्वामीजी देखील असल्याकारणाने चर्चांना वाव मिळाला आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी महंतय्या स्वामींनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.

Tags: