बेळगावमधील गांधी भवन येथे नव्या शैक्षणिक धोरणावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण मंत्री बी सी नागेश यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षणमंत्री बी सी नागेश यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती दिली. तसेच नवे शैक्षणिक धोरण आजच्या युगात किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. समाजातील तळागाळातील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचावे, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी समान शिक्षण नीती असावी, समाज निर्मितीत शिक्षणाचे महत्व किती आहे आणि शिक्षणामुळे व्यक्ती कशी समृद्ध होते, या सर्व गोष्टी शिक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितल्या. गेल्या अनेक वर्षात शिक्षण क्षेत्रात आणि शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला नसल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती झाली नाही. आता नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल, यासाठी प्रत्येक शिक्षकाचे सहकार्य आवश्यक आहे, असे ते म्हणाले.या शैक्षणिक धोरणाचे लक्ष्य हे भारताच्या शिक्षक क्षेत्रात क्रांती घडविण्याचे असून भारताला ज्ञानाच्या स्वरूपात मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांना शिक्षित करणे हा आहे असे ते म्हणाले. समाजाच्या प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविणे हे उद्दिष्ट्य नव्या शैक्षणिक धोरणाचे असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यशाळेस विधान परिषद सदस्य अरुण शहापूर, पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य हनुमंत निरानि, डीडीपीआय गजानन मणिकेरी तसेच शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments