कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी मंत्री ईश्वरप्पा यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असे सांगत बृहत व मध्यम उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी ईश्वरप्पा यांची बाजू उचलून धरली.

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर होत असलेल्या आरोपांसंदर्भात बुधवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना मंत्री मुरुगेश निराणी म्हणाले, या प्रकरणात काँग्रेसने निराणी यांच्यावर केलेले आरोप वास्तवापासून दूर आहेत. विकासकामांच्या टेंडरची स्वतःची अशी एक प्रक्रिया असते. सरकारने सूचना जारी करावी लागते. जाहिरात देऊन निविदा मागवाव्या लागतात. त्यानंतर सरकारने निविदा मंजूर कराव्या लागतात. अशी मोठी प्रक्रिया आहे. या प्रकरणात ही काहीच प्रक्रिया पार पडलेली नाही. काँग्रेस यावरून ईश्वरप्पा यांच्यावर करत असलेले आरोप राजकीय दृष्ट्या प्रेरित आहेत. त्यामुळे ईश्वरप्पा यांनी राजीनामा मुळीच देऊ नये. काहीच पुरावा नसताना राजीनामा देणे योग्य नाही. कुणीही येऊन काही म्हटले म्हणून त्याचा असा संबंध जोडणे चुकीचे आहे असे निराणी म्हणाले.
संतोष आमचा कार्यकर्ता असेलही. अनेक कार्यकर्ते असतात. परंतु त्याला बिलाची अमुक इतकी रक्कम यायची होती असे सांगणे योग्य नाही. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे. त्यात सत्यांश बाहेर येईलच. न्यायालयातून कोणी मोठा नाही असे मंत्री मुरुगेश निराणी यांनी सांगितले.
एकंदर काँग्रेसच्या आरोपावरून मंत्री ईश्वरप्पा यांनी राजीनामा देऊ नये, तपासात सत्य बाहेर येईलच असे उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी सांगितले.


Recent Comments