Belagavi

संतोष पाटील आत्महत्येसंदर्भात येडियुराप्पांची ‘नो कमेंट्स’

Share

४० पर्सेंट कमिशन प्रकरणी ठेकेदार संतोष पाटील यांनी केलेल्या आत्महत्येप्रकणी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे.

ठेकेदार संतोष पाटील यांनी ग्रामविकास मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्यावर ४० टक्के कमिशन मागितल्याचा आरोप ठेवत आपल्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे सुसाईट नोट मध्ये लिहून ठेवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या कमिशन प्रकरणाचा शेवट जरी संतोष पाटील यांच्या आत्महत्येने झाला असला तरी या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला आहे. याप्रकरणी विरोधकांनी मंत्री ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून याप्रकरणी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

बेळगावमध्ये बी एस येडियुरप्पा यांना प्रसारमाध्यमांनी घेरून ईश्वरप्पा यांच्यासंदर्भभात प्रतिक्रिया विचारली असता बी एस येडियुरप्पा यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ईश्वरप्पा यांचा माझ्याशी संबंध नाही असे सांगत याप्रकरणी तपास होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तपास झाल्यानंतर वास्तव समोर येईल, इतकीच प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली आहे.

Tags: