कर्नाटकात घडत असलेल्या घटना साध्यासुध्या, लहान नाहीत. यांत निश्चितपणे मोठा हात आहे. मेलेल्यांच्या नावाने काँग्रेस राजकारण करत आहे असा आरोप भाजप कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी केला.

बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी पत्रकारांशी बोलताना कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणावरून अरुण सिंग यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. या प्रकरणाच्या तपासात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले आहे. ४०% कमिशन आरोपाला अनेक कंगोरे आहेत. ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
राजस्थानमध्ये दलिताची हत्या झाली आहे. करोली येथे महिलेवर ऍम्बुलन्समध्ये महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याचा दाखल देत अरुण सिंग म्हणाले, दावलपूर, सवाई माधवपूरसारख्या दुर्घटना घडूनही रणदीपसिंग सुरजेवाला यांनी तेथे भेट दिली नाही. येथे येण्याऐवजी त्यांनी राजस्थानला जावे, या दुर्घटना घडलेल्या ठिकाणांपासून जवळ असूनही प्रियांका गांधी यांनी तेथे भेट दिली नाही असा आरोप अरुणसिंग यांनी केला.
बेळगावात सुरु असलेल्या भाजपच्या मंथन सभेबाबत माहिती देताना अरुण सिंग म्हणाले, 2023च्या विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाची चर्चा करण्यात येत आहे. मतदारसंघ निहाय सभा घेत आहोत. आज विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील नेत्यांची सभा घेत आहोत असे त्यांनी सांगितले. बाईट
एकंदर काँग्रेस मयताच्या घरात राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप अरुणसिंग यांनी यावेळी केला.


Recent Comments