देश–परदेशात जमीन, जल आणि हवाईमार्गे वेगवान कुरियर सेवा देण्यासाठी ICL अर्थात इंटिग्रेटेड कुरिअर्स अँड लॉजिस्टिकने बेळगावकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.

होय, बुधवारी टिळकवाडीतील सराफ कॉलनीत इंटिग्रेटेड कुरिअर्स अँड लॉजिस्टिकच्या केंद्राचे बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी उदघाटन केले. यावेळी बोलताना मौर्य यांनी कार्गो लॉजिस्टिक्स सेवेला चांगली मागणी असून, त्यात व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. लोकांना तत्पर सेवा देऊन कंपनीने चांगला व्यवसाय करावा असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. बेळगाव विमानतळावरून अनेक राज्यात विमानसेवा देण्यात येत असून या हवाई सेवेचा कंपनीने लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. 
यावेळी पत्रकारांशी बोलताना ICL चे CEO जी. व्ही. रमणा म्हणाले, आम्ही पुरोहित मिठाईंसोबत भागीदारी केली आणि पहिल्यांदाच बेळगावहून यशस्वीरित्या वितरित केली. बेळगावच्या अनेक उत्पादनात अद्वितीय क्षमता देखील आहे, बेळगावमधील कास्टिंग आणि मशीनिंग कार्यक्षमता ही उच्चश्रेणीची आहे. आम्ही बेळगावतील उद्योगांशी आणि ग्राहकांशी संपर्क साधू इच्छितो आणि त्यांना अचूक, व्यावसायिक सेवा आणि अर्थव्यवस्थेसह निर्यात करण्यात मदत करू इच्छितो. ज्यामुळे त्यांना बेळगाव जगासमोर नेण्यास मदत होईल.
ixg Logistics ने ICL सोबत भागीदारी केली आहे. आयएक्सजीचे संचालक विद्याधर पाटील यांनी सांगितले की, ixg Logistics मधील आमचा मुख्य फोकस बेळगाव व परिसरातील व्यक्ती आणि व्यवसायांना अतुलनीय शिपिंग अनुभव देणे हा आहे. आम्हाला बेळगाव ब्रँड जागतिक पातळीवर न्यावयाचा आहे.
पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या मित्रांना आणि नातेवाईकांना बेळगावहून कुंदा निर्यात करण्याची संधी आम्हाला पहिल्यांदाच मिळाली आहे. हे ICL द्वारे आणि त्यांच्याशी आयएक्सजीच्या झालेल्या करारामुळे शक्य आहे.
घरगुती उत्पादने, भारतीय पारंपारिक वस्तु, औषधे आणि इतर उत्पादने जसी स्थानिक संगीत वाद्ये, भांडी इत्यादी 200 हून अधिक देशांमध्ये घरोघरी पोहोचवल्या जातात. गेल्या 16 वर्षांमध्ये आम्ही व्यवसाय आणि व्यक्ती (B2B) आणि C2) हालचालींसाठी सर्वात विश्वासार्ह भागीदार म्हणून प्रख्यात आहोत. आमचे कठोर परिश्रम, समर्पित भावनेने काम करण्याची पद्धत आणि शिपमेंट हालचालींमध्ये वैयक्तिक काळजी देण्याची वचनबद्धता यामुळे ICL एक विश्वासू भागीदार असल्याचे सिद्ध झाले आहे. 


Recent Comments