उडुपी येथे लॉजवर आत्महत्या केलेल्या बेळगावच्या कंत्राटदार संतोष पाटील याच्या घरी उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी बुधवारी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

बेळगावजवळील हिंडलगा येथील समर्थ नगरातील संतोष पाटील या कंत्राटदाराने ग्रामविकास मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर ४०% कमिशन मागितल्याचा आरोप करून, आपल्या मृत्यूला ईश्वरप्पाच जबाबदार असल्याचा आरोप करणारा व्हाट्सअप संदेश प्रसारमाध्यमांना पाठवून उडुपीतील एका लॉजमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर आज उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी संतोष पाटील याच्या निवासस्थानी भेट देऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. फ्लो
यावेळी मंत्री निराणी यांनी पाटील कुटुंबियांचे सांत्वन करून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेणार असल्याचे सांगितले. संतोष यांच्या पत्नीला एखादी सरकारी नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांशी बोलून करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
एकंदर पाटील यांच्या कुटुंबाला सरकारकडून शक्य तितकी मदत देण्याचे आश्वासन उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी यावेळी दिले.


Recent Comments