Khanapur

झोपडपट्टी विकास योजनेतून खानापूरला 469 घरे

Share

झोपडपट्टी विकास योजनेतून खानापूर शहरासाठी . अंजली निंबाळकर यांनी 469 घरे मंजूर करवून घेतली आहेत

होय, झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरासाठी एकूण 469 घरे मंजूर करून घेतली आहेत. त्याअंतर्गत घरबांधणीसाठी नाईक गल्लीत त्यांनी भूमिपूजन करून चालना दिली. नाईक गल्लीत 182 घरे, शाहुनगरसाठी 128 घरे तसेच हरिजन गल्लीसाठी 159 घरे अशी एकूण 469 घरे मंजूर झाली आहेत. यासाठी 31 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या सर्व घरांचे काम 15 महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेशही आ. निंबाळकर यांनी कंत्राटदाराला दिले आहेत.  फ्लो

यावेळी आ. निंबाळकर यांचा नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

Tags: