दुष्काळाच्या झळा अधिक सोसणाऱ्या विजापूर जिल्ह्यात उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत. जसजसा उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे तसतशी या जिल्ह्याची पाणी टंचाईही वाढत चालली आहे. पिण्याच्या पाण्या सहित शेतकऱ्यांना पाण्याविना अनेक अडचणी समोर येत आहेत. यावर पर्याय म्हणून येथील शेतकऱ्यांनी एटीएम च्या धर्तीवर ATW ची संकल्पना सरकारसमोर मांडली आहे. काय आहे या संकल्पनेमागील संकल्पना? पाहुयात या विशेष रिपोर्टमधून…

उत्तर कर्नाटकाची जीवनवाहिनी असणाऱ्या कृष्णा नदीवर अलमट्टी जलाशयाच्या व्याप्तीत कोणत्याही वेळेत पाणी मिळू शकेल याबाबत एक संकल्पना आखली आहे. उन्हात न्हाऊन निघणाऱ्या विजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अलमट्टी जलाशय व्याप्तीतील शेतकऱ्यांसाठी एनी टाइम वॉटर साठी शेतकऱ्यांनी आग्रह केला आहे. अलमट्टी लाल बहादूर शास्त्री जलाशय निर्माणासाठी बागलकोट विजापूर या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जमिनी सोडून दिल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. याला कारण म्हणजे अपुरा पाणीपुरवठा. या भागातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले असून ATM प्रमाणे ATW म्हणजेच एनी टाइम वॉटर हि संकल्पना राबविण्याचा आग्रह केला आहे. 
मुळवाड सिंचन प्रकल्पच्या तिसऱ्या टप्प्यातील कालव्यातून सध्या पाणी पुरवठासाठी परवानगी देण्यात आली नाही. धरणाची पाणी पातळी 524.256 इतकी असून तिसऱ्या टप्प्यातील कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी हे आपल्या व्याप्तीत येत नसल्याचे सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास पाणी सोडण्यात येईल, असे अधिकारी सांगत आहेत. अलमट्टी जलाशयाची लाखो एकर जमीन, राहती घरे देण्यात आली आहेत. संपूर्ण राज्यापेक्षा जिल्ह्याला आधी पाणी पुरवठा करण्यात यावा. येथील शेतकरी मोठ्या संकटात असून शेतकऱ्यांची पाण्याची समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अन्यथा अलमट्टी केबीजेएन मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजापूर जिल्ह्यात पाणी टंचाई भेडसावू लागली आहे. केवळ शेतकरीच नाही तर सर्वसामान्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी अलमट्टी जलाशयाची दिल्या आहेत. मात्र येथील शेतकरी मात्र पाण्यापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना ATM प्रमाणे ATW संकल्पना राबवून पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Recent Comments