State

*सत्तेवर असताना जबाबदारीने बोलणे गरजेचे : मुख्यमंत्री *

Share

राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवरून भाजप सरकारला माजी मुख्यमंत्री लक्ष्य करत आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कुमारस्वामींनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

उडुपी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आता आम्ही सरकार चालवत आहोत. यावेळी आपली भाषा खूप महत्वाची आहे. सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी यांना त्रास होत आहे. माझे मौन त्यांच्यासाठी त्रास ठरत असेल तर आपण काय करावे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी तोंडाला येईल ते बोलतात. शिवमोगा येथे झालेल्या घटनेवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे धारवाड आणि कोलार येथे घडलेल्या घटनेवर देखील कारवाई करण्यात येईल. यात कोणतेही राजकारण होणार नाही, असे प्रत्त्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोविड मार्गसूची बद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक नागरिकाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, नियमांचे पालन केले तर कोणतीही वाईट परिस्थिती अनुभवायची वेळ येणार नाही. प्रत्येकाने नियमाचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ()

यावेळी उडुपी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी निसर्ग संरक्षणाचे महत्व आणि यासाठी सद्गुरूं जग्गी वासुदेव यांनी सुरु केलेल्या अभियानाचे कौतुक केले. भूजल पातळी राखण्यासाठी मातीचे संरक्षण, मातीचे जतन करणे हे माणसाचे आद्य कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उडुपी दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी कुमारस्वामी आणि सिध्दरामय्यांच्या टीकेवर प्रत्त्युत्तर देत आपण सत्तेवर असताना संयमाने बोलणे आवश्यक असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्र्यांप्रमाणे तोंडाला येईल ते बोलणे योग्य नसल्याचा टोला लगावला.

Tags: