Vijayapura

कृष्णा-म्हादई-नवली संकल्प यात्रेसह ट्रॅक्टर रॅली : एस आर पाटील

Share

बागलकोट जिल्ह्यातील बेळगी उत्तर कर्नाटक स्वाभिमान वेदिकेतर्फे म्हादई-कृष्णा-नवली संकल्प यात्रेअंतर्गत ट्रॅक्टर रॅलीचेही आयोजन करण्यात आले असून गदग जिल्ह्यातून १३ एप्रिल रोजी सकाळची ९.३० वाजता शिरहट्टी जगद्गुरू श्री फकीर दिंगालेश्वर महास्वामी यांच्याहस्ते चालना देण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री एस आर पाटील यांनी दिली आहे.

विजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ३.३० वाजता बिळगी तालुक्यातील बाडगंडी बापूजी आंतरराष्ट्रीय शाळेच्या आवारात असंख्यात श्री यांच्या सानिध्यात भव्य जनसमूहाच्या उपस्थितीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी आपण विधान परिषद नेता म्हणून कार्यरत असताना अधिवेशनात या विषयी प्रस्ताव मंडल आहे. तसेच हि योजना कार्यान्वित न झाल्यास तिसऱ्या टप्प्यात ट्रॅक्टर रॅली निधनाचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र आपल्या कोणत्याही विनंतीला सरकारने प्रतिसाद दिला नसून कृष्णा-म्हादई-नवली संकल्प यात्रेसह ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती एस आर पाटील यांनी दिली. ()

Tags: