Vijayapura

लिंबू उत्पादकांसाठी खुशखबर वाढत्या मागणीमुळे लिंबू दर वधारले संकटात सापडलेल्या लिंबू उत्पादकांच्या चेहऱ्यावर आनंद

Share

उन्हाळा सुरु झाल्याने लिंबूच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून परिणामी लिंबू दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षातील कोरोना काळामुळे अडचणीत आलेल्या लिंबू उत्पादकांसाठी हि खुशखबर असून वाढत्या मागणीमुळे लिंबूचे दर वाढल्याने लिंबू उत्पादकांना चांगला परतावा मिळत आहे.

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लिंबूचे उत्पादन घेतले जाते. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर लिंबू उत्पादक अत्यंत अडचणीत आले होते. मात्र यंदा लिंबूच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी लिंबू दरात देखील वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात लिंबू उत्पादकांवर अत्यंत अडचणींचा काळ आला. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र हे चित्र पालटले असून लिंबू उत्पादकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. गेल्या १५ दिवसांपासून लिंबूचे दर वधारले असून लिंबू उत्पादकांसह द्राक्षे उत्पादक देखील खुश आहेत. २०१९ पासून आजपर्यंत लिंबूच्या दराने उच्चांक गाठला आहे. विजापूर पीएमसी आवारात लिंबू दरात वाढ झाली आहे. प्रति १००० नग लिंबूंसाठी ४ त १० हजार रुपयांचा दर मिळत आहे. तर बाजारात प्रति लिंबू ४ ते ८ रुपयांना मिळत आहे. कोरोना, वातावरणात झालेले बदल यामुळे गेल्या दोन वर्षात लिंबू उत्पादक विविध अडचणींचा सामना करत होते. मात्र लिंबू उत्पादकांना यंदा चांगले दिवस आले असून याचा आनंद लिंबू उत्पादकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. विजापूर जिल्ह्यातील इंडी, चडचण, सिंदगी, देवर हिप्परगी, बसवणं बागेवाडी यासह अनेक भागात लिंबूचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. राज्यात सुमारे ४० हजार लिंबू उत्पादक आहेत. यातील एकट्या विजापूर जिल्ह्यातच २५ हजार उत्पादक आहेत. राज्यातील एकूण लिंबू उत्पादन प्रदेश विजापूर जिल्ह्यात अधिक आहे. राज्यात एकूण २१००० हेक्टर क्षेत्रफळ प्रदेशात लिंबू उत्पादन घेतले जाते यापैकी १६००० हेक्टर प्रदेश हा विजापूर जिल्ह्यात आहे. यंदा मात्र लिंबू उत्पादन कमी आणि मागणीत वाढ झाल्याने दर वधारले आहेत. या भागात घेतल्या जाणाऱ्या लिंबू उत्पादनाला गुजरात, महाराष्ट्र यासह अनेक राज्यात मोठी मागणी आहे. उन्हाळी दिवस सुरु झाल्याने लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे.

कोरोना, खराब हवामानामुळे बसलेला फटका या कारणामुळे लिंबू व्यावसायिक अनेक अडचणींचा सामना करत होते. सध्या उन्हाच्या झळा तीव्र जाणवू लागल्याने लिंबूच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.. परिणामी लिंबू दरात देखील वाढ झाली आहे. आपल्या उत्पादनाला योग्य भाव मिळत असल्याने लिंबू उत्पादकांच्या चेहयावर मात्र आनंद झळकताना पहायला मिळत आहे.

आपली मराठीसाठी विजयकुमार सारवाड, इन न्यूज नेटवर्क, विजापूर

Tags: