Belagavi

बेळगावचे धारिणी महिला मंडळ जिनभजन स्पर्धेत राज्यात प्रथम

Share

म्हैसूर येथे झालेल्या राज्यस्तरीय जीन भजन स्पर्धेत बेळगावच्या धारिणी महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे

होय, म्हैसूर येथील कलामंदिरात डॉ. वीरेंद्र हेग्गडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेंद्रकुमार आणि अनिता सुरेंद्रकुमार यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय जिनभजन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या उपांत्यफेरीत 37 संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीत 13 संघ होते. त्यांच्यात झालेल्या स्पर्धेत बेळगावच्या धारिणी महिला मंडळाच्या सदस्यांनी एकाहून एक सरस जिनभजने सादर केली. त्यामुळे त्यांना पहिल्या क्रमांकाने गौरविण्यात आले. त्याशिवाय या मंडळाला 14 एप्रिलला बेंगळुरातील रवींद्र कलाक्षेत्र येथे होणाऱ्या महावीर जयंती कार्यक्रमात भागघेण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी सोमवारी धारिणी महिला मंडळाच्या सदस्यांनी बेळगावहून बंगळूरला प्रयाण केले.  फ्लो

धारिणी महिला मंडळाच्या या सदस्यांत माणिक कलमनी, पद्मश्री पाटील, रत्ना अजरी, अंकिता पाटील, आरती उमसगी आदींचा समावेश आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावर यासंदर्भात ‘आपली मराठी’सोबत बोलताना धारिणी महिला मंडळाच्या सदस्यांनी सांगितले की, राज्यस्तरीय जिनभजन स्पर्धेत आमचा प्रथम क्रमांक आल्याने आम्हाला आनंद झाला आहे. आम्हाला 35 हजार रुपये रोख आणि चांदीची सरस्वती मूर्ती बक्षीस देण्यात आली आहे. बंगळुरात होणाऱ्या महावीर जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील सहभागी होणार आहेत. त्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आम्ही आतूर झालो आहोत असे सांगितले. बाईट+बाईट

एकंदर धारिणी महिला मंडळाच्या या यशाने बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय हे मात्र खरे.

Tags: