क्षयरोग नियंत्रणाबाबत सरकारकडून जनजागृती करण्यासाठी एलईडी स्क्रीनच्या वाहनाद्वारे मोहीम आखण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज या मोहिमेचे उदघाटन केले.

होय, बेळगाव जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रणासाठी जनजागृती करण्यासाठी एलईडी स्क्रीन असलेल्या वाहनाच्या माध्यमातून जागृती मोहीम आखण्यात आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी या एलईडी स्क्रीनवर जागृती करणारी चित्रफीत पाहून या मोहिमेला चालना दिली.
यानिमित्त प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ म्हणाले, 2025 पर्यंत संपूर्ण भारत देश क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्त जनजागृती मोहीम आखली आहे. क्षयरोग नियंत्रणात बेळगाव जिल्ह्याला रौप्य पदक मिळाले आहे ही समाधानाची बाब आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी जागृती वाहन ३ दिवस फिरून क्षयरोग निवारणाबाबत जागृती करणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सरकारी अधिकारी आणि जनतेने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. बाईट
एकंदर सरकारने 2025 पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प करून जनजागृती मोहीम राबवली आहे. त्याला जनतेचं सहकार्य लाभल्यास निश्चितच ही मोहीम यशस्वी होईल यात शंका नाही.


Recent Comments