अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे बेळगावातील सुभाषनगरमध्ये मोफत विद्यार्थिनी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. येत्या बुधवारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याहस्ते त्याची कोनशिला बसविण्यात येणार आहे.

सोमवारी बेळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या बेळगाव जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद यांनी ही माहिती देऊन सांगितले की, महासभेतर्फे वीरशैव लिंगायत विद्यार्थीनींसाठी मोफत तत्वावरील वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्याची कोनशिला बुधवारी सकाळी 8.30 वाजता माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याहस्ते बसविण्यात येणार आहे. यावेळी नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री अल्लमप्रभू स्वामीजी, कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, खा. मंगल अंगडी, बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्यासह वीरशैव महासभेचे राज्य व राष्ट्रीय अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सध्या 50 विद्यार्थिनी राहू शकतील अशा क्षमतेचे वसतिगृह बांधण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने ही क्षमता वाढविण्यात येईल असे रत्नप्रभा बेल्लद यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला वीरशैव महासभा जिल्हा शाखेच्या डॉ. गुरुदेवी हुलैपन्नावरमठ, जयपती भाविकट्टी, रमेश कळसन्नावर आदी उपस्थित होते.


Recent Comments