हुक्केरी तालुक्यातील एलीमुन्नोळी ग्राम पंचायतीत जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

होय, एलीमुन्नोळी ग्राम पंचायतीची ग्रामसभा आज घेण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जलजीवन मिशन योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करून चांगलेच फैलावर घेतले. ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही अधिकारी त्याकडे काणाडोळा करत आहेत. गावात जलजीवन मिशन योजनेसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. ते अजूनपर्यंत बुजविण्यात आलेले नाहीत. गटारीच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीचा व्हॉल्व बसविण्यात आला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे. उद्या यातून काही बरेवाईट झाल्यास कोण जबाबदार? असा सवाल ग्रामस्थांनी केला. गावातील समस्यांवरून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. फ्लो
या ग्रामसभेला नोडल अधिकारी, ग्रापं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments